परफेक्ट बॅलन्सिंग
शालेय जीवनात एक उत्कृष्ट जिम्नॅस्ट असलेली नीलम भोसले माझी सून म्हणून घरी आली त्यावेळी ती एका आयटी कंपनीत अधिकारी होती. लग्नाच्यावेळी तिची एकच अट होती, तिला पूर्वायुष्यातले जिम्नॅस्टिक्सचे करिअर चालू ठेवायचे होते. मीही माझ्या पूर्वायुष्यात एक उत्कृष्ट खेळाडू असल्याने आमची याला अजिबात हरकत नव्हती. ऐन लग्नाच्या वेळी मुलाच्या पायाचे फ्रॅक्चर झाले आणि ते मोरपंखी दिवस दोघांनाही हॉस्पिटल आणि घर असे घालवावे लागले. पण या काळातही ती हसतमुख आणि खंबीर राहिली. मला चित्रकला, हस्तकलेची खूप आवड. खूप वर्षांपासून गणपतीची सजावट मी स्वत: करते. त्यावषीर्ची सजावट खूप छान झाली होती. आम्ही स्पधेर्साठी फोटो पाठवायचे ठरवले. स्वत: धावपळ करून तिनेच फोटो पाठवले. त्यावषीर् मला बक्षीस मिळाले. ईटीव्हीवर कलाकृती सादर करण्याचे संधीही मिळाली. अचानक मिस्टरांचे हृदयविकाराचे दुखणे सुरू झाले. नंतर ते आम्हाला सोडून गेले, त्याकाळातही तिचा आधार मोलाचा होता. आता कधी कधी तीच माझू सासू बनते. माझ्या औषधपाण्याची फोनवरून चौकशी करते. सासरमाहेर दोन्हींकडच्या माणसांमधला सुंसवाद तिने कायम ठेवला आहे. मुळची जिम्नॅस्ट असल्यानेच तिला हे बॅलन्सिंग छान जमते.
लोड होत आहे...