एका विवाहित पुरुषाबरोबर तिची नाजूक फ्रेण्डशिप सुरू होती. अर्थात, दोघंही त्यात सीरियस नव्हते. ही फारच चांगली गोष्ट होती. दोन क्षण मजेत घालवायचे, मग आपापल्या जगात आपापल्या मार्गाने चालू पडायचं.
मारियाला तेरा भावंडं होती. मला हे कळवलं तेव्हा मी चपापून दचकून ओरडलेच. त्यांचं कुटुंब मोठं होतं. मोठ्या कुटुंबाचे प्रश्नही मोठे होते. व्यक्तिगत बोलता बोलता आम्ही दोघीही अंगणाबाहेर जायचो.
म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, कम्युनिझम, हाँगकाँगमधील सिच्युएशन, साहित्यात काय चांगलं आहे, कविता कोणत्या चांगल्या, क्लासिक- अभिजात फिल्मची लक्षणं, स्ट्राँग पॉइण्ट इथपासून ते स्त्री-पुरुष संबंधातली गोची नेमकी काय, इथवर आम्ही बोलायचो.
नंतर ती तिच्या जगात परत गेली. तिथे एक सातपानी तलम कागदावर लिहिलेलं पात्र माझ्याकडच्या चांदीच्या पेटीत मी जपून ठेवलंय. तिच्या सुगंधी छान आठवणींसारखं. ती म्हणते, 'कधी कधी मला कळत नाही. एकाच वेळी आपण पुरुषावर प्रेम करतो आणि कवितेतून अभिव्यक्त होताना त्यांच्या असंवेदनशीलतेवर प्रहारही करतो. का? कारण की जीवन आणि प्रेम परफेक्ट नसतं. 'ञ्जद्धद्गह्मद्ग ड्डह्मद्ग द्बद्वश्चह्वह्मद्बह्ल४, द्बद्वश्चद्गह्मद्घद्गष्ह्लठ्ठद्गह्यह्य ड्डद्यद्य श्ा१द्गह्म द्यद्बद्घद्ग x द्यश्ा१द्ग' तिचं दु:ख, तिचे विचार ती इतक्या खोलवर सर्व बाजूंनी परिपक्वपणे मांडायची-तपासायची, स्वत:चं तपासणं एकांगी होईल म्हणून ती माझ्यासारख्या आणखी मित्रमैत्रिणींच्या नजरेतूनही तपासत होती. तिने आणि माझ्या इतर चांगल्या मित्रांनी मला प्रचंड श्रीमंत केलं.
- मिलान कुण्डेराच्या 'ह्वठ्ठड्ढद्गड्डह्मड्डड्ढद्यद्ग द्यद्बद्दद्धह्लठ्ठद्गह्यह्य' या पुस्तकाबद्दल तिने खूप लिहिलं. तिला प्रश्न पडला की 'आपण यातलं काय निवडू? जडता की चेतना? माझ्या प्रेमप्रकरणात मी फार भयानक चेतनेचा अनुभव घेतला.'
मारियकडे दुटप्पीपणा नव्हता, संपूर्ण जीवनाकडे विलक्षण आरपार पारदशीर् नजरेने ती बघायची. स्वत:च्या अनुभवांना -आयुष्याला धीटपणे ताठपणे सामोरं जाणं ही एक आयुष्याची गरज असते. मग ते अस्तित्व स्त्री असो की पुरुष. मारियाला माझ्याही आधी ही गोष्ट कळाली. एका अत्यंत सुंदर परिपक्व अभिजात अस्सल कवितेप्रमाणे ती माझ्या आयुष्यात मनात पसरली-रुजली-वाढली. कधीही न कोमेजणाऱ्या फुलांसारखी तिची आठवण दरवळत राहील. पुढेही. मग ती भेटो ना भेटो. कुठेही असो. आयुष्य तिच्यासारख्या संवेदनक्षम, आयुष्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना साद घालत येतं. जिवंत, चैतन्याने रसरसलेलं आयुष्य अशा माणसांना शोधतच हिंडत असतं!

लोड होत आहे...
प्रतिसाद