Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

बारीक व्हायचे मग हे नक्कीच वाचा


वजन कमी करण्यासाठी डाएट करण्याचं फॅड हल्ली पसरलंय. डाएटच नाही, तर क्रॅश डाएट करण्यावर आजच्या यंग जनरेशनचा भर असतो. पण या क्रॅश डाएटिंगचा शरीरावर किती परिणाम होऊ शकतो, याची जाणीवही यापैकी कित्येकांना नाही. वजन कमी करण्यासाठी खाणंपिणं बंद करून स्वत:ला उपाशी ठेवण्याची शिक्षा कशाला द्यायची? वजन कमी करायचं, तर पुढे दिलेल्या पाच गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेसं आहे.

खाणंपिणं बंद करून शरीरावर अत्याचार करू नका. कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. अधिक कॅलरीयुक्त आहार बंद करून कमी कॅलरीयुक्त खाण्याची निवड तुम्ही करत असाल. यामुळे वजन कमी होईल, पण त्याचबरोबर तुम्ही अशक्तही व्हाल, हे लक्षात ठेवलेलं बरं! शरीराला आवश्यक असतं, त्यापेक्षा कमी कॅलरीज आहारातून शरीराला मिळाल्यास तुम्ही शरीराला कुपोषित करता आहात, हे लक्षात घ्या. यामुळे शरीरातील फॅट्स नाही, तर पाणी आणि स्नायूंचा बळकटपणा तुम्ही गमावून बसाल. वजन कमी होईल, पण फॅट्स तसेच राहतील. यामुळे आळशीपणा, अशक्तपणा, डोकुदुखी, मन एकाग्र करायला न जमणं, थकवा अशा समस्या जाणवू लागतात. म्हणूनच खूप कॅलरी किंवा कमी कॅलरीयुक्त अशा दोन्ही प्रकारचं खाणं टाळा. या उलट योग्य आणि समतोल आहार घ्या.

ा समतोल आहार : कमी कॅलरी आणि अधिक फायबर असणारं खाणं घ्या. सलाडस आणि ताजी फळं नियमितपणे खायला हवीत. सलाड ड्रेसिंग करणं टाळा. कडधान्य, भाज्यांचे सूप्स भरपूर घ्या. बीफ, पोर्क, हॅम, सॉसेज असं रेड मीट आणि ऑर्गन मीट (कलेजी, भेजा) आणि अंड्याचा बलक खाऊ नका. यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. सॅच्युरेटेड फॅट्स, तेलकट आणि गोड पदार्थ, आइस्क्रीम, चॉकलेट्स न खाल्लेलंच बरं! मोड आलेली कडधान्यं खा. यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.

ाजेवण बंद करू नका : जेवण बंद करण्याची चूक कधीच करू नका. एक वेळचं जेवण बंद करून तुम्ही वजन कमी करू शकाल, असं जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही चुकताय. कारण बऱ्याच वेळाने जेव्हा तुम्ही खाता, तेव्हा अधिक खाता आणि हे सगळं तुमच्या वजन कमी करण्याच्या इराद्यावर बोळा फिरवेल.

ा ब्रेकफास्ट : हा सगळ्यांच्याच खाण्याचा महत्त्वाचा भाग. दिवसातलं पहिलं जेवण म्हणजे ब्रेकफास्ट. दिवसभरासाठी शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा या ब्रेकफास्टमधूनच मिळते. त्यामुळे ब्रेकफास्ट नेहमी हेवी घ्यायला हवा. त्यामानाने रात्रीचं जेवण अगदी लाइट घ्या. रात्री जेवणानंतर आपण बऱ्याचदा लगेचच झोपतो. त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील फारशा कॅलरीज खर्च होत नाहीत. अशा वेळी जास्त जेवल्यास कॅलरीज खर्च न होता शरीरात तशाच साठून राहतात आणि याचं रूपांतर फॅट्समध्ये होतं.

ा काही गोष्टी लक्षात ठेवा : भरपूर प्रमाणात तीन जेवण घेण्याऐवजी सहा लहान लहान भागात खाणं योग्य ठरेल. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी प्या. जेवताना लक्ष फक्त जेवणावरच असू दे. टीव्ही बघत किंवा पुस्तकं वाचत, फोनवर बोलत जेवू नका. प्रत्येक घास नीट चावूनचावून खा. यामुळे अन्नपचन नीट होते. भूकेपेक्षा अधिक खाऊ नका. आवडता पदार्थ आहे, म्हणून भरपूर खात सुटू नका. बाहेर जेवायला जाणार असल्यास हाय कॅलरी फूड टाळलेलंच बरं.

ा व्यायाम : शरीराला आवश्यक आहे, तेवढं खायलाच हवं. पण, व्यायाम करणं टाळू नका. नियमित वर्कआऊट करायला हवं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर आवश्यक तो व्यायामही होतो. मॉनिर्ंग वॉक, ट्रेडमील, जॉगिंग, योग, मेडिटेशन आदी करून शरीराच्या वाढत्या आकारावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. कितीही उपाय केले, तरी वजन कमी होत नाही हे पाहून निराश होण्याची अजिबात गरज नाही. संतुलित आहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून वजन नक्कीच कमी करता येईल.

प्रतिसाद

Re: बारीक व्हायचे मग हे नक्कीच वाचा
khup mahatwacha aahe thanka mitqaki tai
Re: बारीक व्हायचे मग हे नक्कीच वाचा
khup chaan aahe
नकार