Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

प्रेम कविता मैत्रीण माझी


मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणा-या इवलाश्या रोपटयासारखी


हसणं तिचं खळखळणा-या झ-यासारखं
मनही तिचं त्यातील निर्मळ पाण्यासारखं


आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी


भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी


तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर


तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

प्रतिसाद

Re: प्रेम कविता मैत्रीण माझी
mazi suddha ashich maitrin aahe...
Re: प्रेम कविता मैत्रीण माझी
aapan great aahat
नकार