आज काल ज्याला बघा त्याला फक्त बारीक व्हायचय त्यासाठी टिप्स देत आहे.
चवळीची शेंगेसारखी शरीरयष्टी ही हल्ली प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. आता हे स्वप्न 'झिरो फिगर' या संकल्पनेपर्यंत येऊन पोहोचले आहे. 'टशन' या चित्रपटात 'झिरो फिगर'ची दाखवून अभिनेत्री करीना कपूर या फॅशनची जणू ब्रॅन्ड अॅम्बॅसेडर बनली आहे. आज तरुणींसह महिलावर्ग करीनाचे अनुकरण करताना दिसतो आहे. ![]()
कालपर्यंत (36-24-36) ही 'परफेक्ट फिगर' साइज समजली जात होती. फॅशनच्या युगात मात्र ही साइज आता कालबाह्य होऊन 'झिरो फिगर' चा (31-23-32) जमाना आला आहे. 'झिरो फिगर' साठी करीना कपूरने 'पावर योगा' व डाएटचा सहारा घेतला. तब्बल आठ महिन्यांच्या मेहनतीनंतर तिने 'झिरो फिगर' प्राप्त केली.
हल्ली तरुणींमध्ये त्यांच्या आरोग्यासंदर्भात भरपूर जागरूकता निर्माण झाली आहे.'फिगर मेंटेन' करण्यासाठी फिटनेस सेंटर व योगा क्लासेसमध्ये जाऊन महिला देखील हजारो रुपये खर्च करताना दिसत आहेत.
वजन वाढवणे, कमी करणे, केस छोटे-मोठे करणे... हे कलाकारांच्या व्यवसायाचा भाग आहे. आता करीनालाच पाहा ना! तिने 'टशन' या चित्रपटासाठी वजन कमी केले व आता तर ती स्वत:च्या 'टशन'साठी पुन्हा वजन वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. ![]()
हल्ली महिलांचे राहणीमान, वागणे व बोलणे 'टोटल फिल्मी' झाले आहे. फिटनेस सेंटरमध्ये जाऊन पाहिले तर तेथे आपल्याला 10 तरुणींच्या मागे 3 तरुणी 'झिरो फिगर' साठी आलेल्या दिसतात. जाड शरीरयष्टी असलेल्या तरुणी अथवा महिलांनी 'झिरो फिगर'चा आग्रह धरणे ठीक आहे. मात्र, ज्या तरुणी आधीच सळपातळ आहेत. त्यांना झिरो फिगर घातक ठरू शकते, असे डॉक्टरांचे मत आहे.
प्राणायाम, व्यायाम करून हळू-हळू वजन कमी करता येते. मात्र, वेगळ्या मार्गाने झटपट वजन कमी केल्यास त्याचा शरीर तसेच सौंदर्यावर विपरित परिणाम होतो.
फॅशनच्या या भूताने तरुणींना इतके पछाडले आहे की, 'झिरो फिगर' करण्यासाठी त्या अन्नपाणी सोडून शरीर अशक्त करण्याच्या मागे लागल्या आहेत.
लोड होत आहे...