Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

त्वचेची योग्य काळजी काही टीप्स


महागडा पोशाख, भरपूर दागिने, हेवी मेकअप करून इम्पेशन जनरेट करता येत असलं, तरी केवळ निरोगी, नितळ आणि टवटवीत त्वचा हे सौंदर्याचं साधं सोपं स्टेटमेण्ट कोणत्याही मेकअप आणि पोशाखी इम्पॅक्टला क्षणार्धात निष्प्रभ ठरवू शकतं.

जर तुमच्याकडे त्वचेची देणगी असेल तर उत्तमच. पण विकार, अनियमित आहार, दगदग, टेन्शन, प्रदूषण, ताण आणि दुर्लक्ष या सगळ्याची पहिली शिकार असते ती आपली त्वचा. त्यातही चेहरा, मान, हात आणि पाय हे भाग जास्तीतजास्त एक्स्पोज होणारे असतात. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष पुरवणं अधिक आवश्यक असतं.

यातही सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो तो चेहरा! चेहऱ्याच्या सौंदर्याबाबत अनेकांचा गैरसमज असतो. माकेर्टमध्ये उपलब्ध असणारी, जाहिरातीत दाखवणारी महागडी प्रसाधनं नियमित वापरली, की आपली त्वचा चांगली राहिल, असं अनेकांना वाटतं. त्यामुळे या प्रसाधनांवर भरमसाठ खर्च करूनही चेहऱ्यावरच्या पुटकुळ्यांचं प्रमाण कमी होत नाही तेव्हा नैराश्य येऊ लागतं. यासाठी योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

* चेहऱ्याची त्वचा आणि पाण्याचा सगळ्यात जवळचा संबंध आहे. आपल्या चेहऱ्यासाठी पाणी हे सगळ्यात उत्तम प्रसाधन आहे, हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे. अर्ध्या लिटरची रिकामी बाटली कायम पर्समध्ये ठेवावी. आणि जेव्हा तहान लागेल तेव्हा त्या बाटलीतूनच पाणी प्यावे. म्हणजे आपण किती पाणी प्यायलो, याचा अंदाज घेता येतो.

दिवसातून अशा किमान दहा बाटल्या तरी पाणी पोटात जातंय की नाही याकडे लक्ष ठेवा. त्याचबरोबर दर अर्ध्या तासाने चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारायची सवय लावून घेणं आवश्यक आहे. तुमची स्किीन खूप सेन्सिटिव्ह असेल तर या साध्यासोप्या वॉटर थेरेपीमुळे ती बॅलन्स होईल. त्याच्यातले मूळ दोष कमी व्हायला खूप मदत होऊ शकेल.

* प्रदूषणांपासून दूर राहण्यासाठी चेहरा शक्य तेव्हा कव्हर करा. पण ते पुरेसं नाही. महिन्यातून एकदा तरी क्लिनअप करायला हवं. कारण प्रदूषणामुळे चेहऱ्यावर व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्सचं प्रमाण वाढत जातं. ब्लॅकहेड्समुळे चेहरा काळवंडतो, तर व्हाइटहेड्समुळे पिंपल्सचं प्रमाण वाढतं.

* चेहरा नितळ असला आणि टवटवीत नसला तरी त्याचा इम्पॅक्ट हवा तसा पडत नाही. यासाठी आवश्यक असतो चेहऱ्याचा व्यायाम. सकाळी उठल्यावर फेशिअल मसल्स स्टीफ झाले असतात. त्यासाठी चेहरा शक्य तितका स्ट्रेच करत गाल, भुवया, कपाळ, ओठ, हनुवटीला व्यायाम द्यावा. मसल्स फ्री झाल्यावर चेहऱ्यावरील रंध्रांना श्वास घ्यायची संधी मिळते.

* विविध तणावांचा प्रभावही चेहऱ्यांवर पडतो. यासाठी अॅक्युप्रेशर थेरेपीने तणावाचे पॉइण्ट रिलॅक्स करता येतात. शिवाय यासाठी लाफ्टर थेरेपी हा एक उत्तम उपाय आहे. दिवसातून निदान दहा मिनिटं ही थेरेपी वापरल्यास चेहऱ्यावरील ताणाचा प्रभाव कमी व्हायला मदत होते.

* आहारात फायबरचा समावेश करायला विसरू नका. यामुळे चेहऱ्याला तजेला येतो.

चेहरा नितळ आणि टवटवीत असेल तर अनेक त्रुटी आपोआपच झाकल्या जातात. नकळतच कॉन्फिडन्स लेव्हल वाढते.

उगाचच आटिर्फिशियल मेकअपने चेहरा झाकण्याऐवजी, जस्ट वेअर अ स्किन अॅण्ड यू कॅन रॉक विथ यूअर ओन ब्युटी!

प्रतिसाद

Re: त्वचेची योग्य काळजी काही टीप्स
tai ajun lekh dyaa.........
नकार