Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

दिवाळीत बायको ला साडी घेताय आधी जरा हे वाचा


'साडी' ही भारतीय महिलेचा पारंपारिक पेहराव मानला जातो. महिलेला परिपूर्णत्व प्रदान करून तिच्या सौंदर्यात साडी वृध्दी करते. साडी ही आज पारंपरिक पेहराव म्हणून नाही तर आधुनिक युगात फॅशनेबल लूकमध्ये नेसली जात आहे.
साडीवर केल्या जाणार्‍या जरदारीचे नक्षी काम व इतर कलाकुसरीमुळे साडी अधिक आकर्षक होते. लग्न अथवा समारंभामध्ये महिलावर्ग हेवी वर्क असलेल्या महागड्या साड्या नेसण्यास पसंती दर्शवतात. विविध प्रकारात साडी नेसून कार्यक्रमात सर्वत्र मिरतात.

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन, दीपावली, गृहप्रवेश, विवाह आदी सण-समारंभांवेळी सुना-मुलींना साडी भेट म्हणून दिली जाते. सणांच्या दिवसात तर बाजारात विवि‍ध प्रकारातल्या साड्या उपलब्ध होतात. तर एखाद्या चित्रपटामध्ये नटीने नेसलेली साडी, त्या नटीच्या नावाने ओळखल‍ी जाते. तर आजच्या फॅशन युगात खाटली वर्क, कॉपर वर्क, वाटर सीक्वेंस, जूट वर्क आदी प्रकरातल्या साड्या महिलावर्गाला आकर्षित करत आहेत.


साडीची फॅशन कधी जुनी होणार नाही. जुन्या कलाकुसरीमध्ये मॉडिफिकेशन करून त्याला थोडा फॅशनेबल टच देऊन उत्पादक साड्या बाजारात आणतात. महिलावर्गाकडून अशाच प्रकारच्या साड्यांना अधिक मागणी आहे.

साडी ही नेहमी सदाबहार असते कारण, कुठल्याही ऋतुत ती सहजरीत्या नेसता येते. महिलेचे शरीर झाकण्यापासून तिला सौंदर्य प्रदान करण्याचे काम साडी करत असते.

प्रतिसाद

Re: दिवाळीत बायको ला साडी घेताय आधी जरा हे वाचा
sundar lekh
नकार