Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

स्त्री सौंदर्य आरोग्य महत्वाचे टिप्स

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि निरोगी कसे रहावे काही महत्वाचे टिप्स*
मॉईस्चराइझरचा वापर
मॉईश्चराइझरचा वापर त्वचेचे संरंक्षण करतो. बाहेरच्या वातावरणापासून त्वचेचा बचाव होतो. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मॉईश्चराइझरचा वापर केला जातो. मुख्यतेने 30 वर्षांनंतर या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अंघोळीनंतर आणि झोपण्याअगोदर याचा वापर केला पाहिजे. दुधात गुलाबाच्या पाकळ्या, जायफळ भिजून ठेवावे. मग त्याची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावल्याने त्वचा सुरेख, नाजुक आणि स्निग्ध दिसते.

* हाता-पायाकडे दुर्लक्ष करणे टाळावे
हिवाळ्यात आपल्या हाता-पायांकडे विशेष करून लक्ष द्यायला हवे. हातावर साय, लिंबू, ग्लिसरीनचा वापर करावा. जवस किंवा बदामाच्या तेलाने मॉलिश करावी. हिवाळ्यात पायांच्या टाचा तडकून त्यातून रक्तसुद्धा येते. या समस्येपासून सुटका करण्यासाठी सर्वांत आधी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ टाकून काही काळासाठी पायांना त्यात ठेवावे. नंतर ब्रशाने हळू हळू टाचा स्वच्छ करून टॉवेलने पुसून काढाव्या व क्रीम लावून मोजे घालावे. त्याने आराम मिळतो.

* ओठांचे संरक्षण
ओठांवर रात्री झोपायच्या आधी आणि सकाळी अंघोळ केल्यानंतर साजुक तूप किंवा साय लावायला पाहिजे. ओठ फाटले असतील तर त्यावर लिपिस्टिकचा वापर करू नये. त्याबदल्यात बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉपस्टिक मिळतात, त्याचा वापर करावा.
* त्वचेवर स्क्रबचा वापर
स्क्र्बचा वापर केल्याने त्वचा नरम पडते, स्क्रब दाणेदार असल्यामुळे याचा वापर क्रीम टाकून करावा. कोरड्या त्वचेवर याचा वापर करू नये. कारण कोरडी त्वचा संवेदनशील असल्यामुळे स्क्रबचा वापर त्रासदायक ठरू शकतो. चेहरा थोडा ओला असताना स्क्रबचा प्रयोग करावा, नंतर बोटांनी चेहर्‍याला मसाज करून चेहरा धुऊन टाकावा, पण कोरड्या त्वचेवर स्क्रब 2-3 मिनिटच लावावे.



अधिक मजेशीर धमाल ब्लॉग >>



प्रतिसाद

Re: स्त्री सौंदर्य आरोग्य महत्वाचे टिप्स
chan
Re: स्त्री सौंदर्य आरोग्य महत्वाचे टिप्स
chan
Re: स्त्री सौंदर्य आरोग्य महत्वाचे टिप्स
gud one
नकार