Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

घरगुती मसाज सुंदर दिसा टिप्स


रक्तप्रवाहासाठी मसाज

मसाज केल्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. म्हणून हिवाळ्यात आठोड्यातून कमीत कमी 2 वेळा चेहर्‍याबरोबरच पूर्ण शरीराची मॉलिश करून अंघोळ करावी.

* त्वचेवर स्क्रबचा वापर
स्क्र्बचा वापर केल्याने त्वचा नरम पडते, स्क्रब दाणेदार असल्यामुळे याचा वापर क्रीम टाकून करावा. कोरड्या त्वचेवर याचा वापर करू नये. कारण कोरडी त्वचा संवेदनशील असल्यामुळे स्क्रबचा वापर त्रासदायक ठरू शकतो. चेहरा थोडा ओला असताना स्क्रबचा प्रयोग करावा, नंतर बोटांनी चेहर्‍याला मसाज करून चेहरा धुऊन टाकावा, पण कोरड्या त्वचेवर स्क्रब 2-3 मिनिटच लावावे.

* मॉईस्चराइझरचा वापर
मॉईश्चराइझरचा वापर त्वचेचे संरंक्षण करतो. बाहेरच्या वातावरणापासून त्वचेचा बचाव होतो. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मॉईश्चराइझरचा वापर केला जातो. मुख्यतेने 30 वर्षांनंतर या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अंघोळीनंतर आणि झोपण्याअगोदर याचा वापर केला पाहिजे. दुधात गुलाबाच्या पाकळ्या, जायफळ भिजून ठेवावे. मग त्याची पेस्ट तयार करून चेहर्‍यावर लावल्याने त्वचा सुरेख, नाजुक आणि स्निग्ध दिसते.




अधिक फोटोज़ मजेशीर धमाल ब्लॉग >>


प्रतिसाद

Re: घरगुती मसाज सुंदर दिसा टिप्स
thanks
नकार